प्लाझ्मा दात्यांना देणार दोन हजार रुपये – महापौर

पिंपरी – करोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत आहे. प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे. तसेच, या प्लाझ्मा दात्यांना महापालिकेकडून दोन हजार रुपयांची प्रोत्साहनात्मक मदत दिली जाणार आहे अशी माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.

सध्या खासगी रुग्णालयांमधील रुग्णांना प्लाझ्मासाठी प्रत्येकी सहा हजार रुपये दराने प्लाझ्मा घ्यावा लागत आहे. त्याऐवजी आता महापालिकेच्या रक्तपेढीतून या रुग्णांना मोफत प्लाझ्मा पुरविण्यात येणार आहे. याचा शहरातील गरजू नागरिकांना लाभ होणार आहे.

संसर्गाच्या भीतीने रक्तदानाचे प्रमाण कमी झाले असून प्लाझ्मा संकलन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. करोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मादान करू शकतात. प्लाझ्मा थेरपीसाठी दाता हवा आहे असे असंख्य फोन आणि मेसेज येत आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात रक्तदान मोहीम थंडावते. शिवाय करोना संसर्गामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा फटका प्लाझ्मादानाला बसला आहे. करोनामुक्त व्यक्ती व शहरातील विविध सामाजिक संघटनांनी करोनावर मात करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.