सांगवी, दि. 29 (प्रतिनिधी) –छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै.सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय, शिशुविहारातील विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी दोन हजार राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांचे बॉक्स “24 मराठा लाईट इन्फंट्री’च्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
यावेळी 24 मराठा लाईट इन्फंट्री औंध कॅम्पचे कॅप्टन हरिओम कुमार यांनी “कारगिल विजय दिन’ कार्यक्रमात या राख्यांच्या बॉक्स स्वीकारले. या राख्या सीमवेरील जवानांकरिता पाठविण्यात येणार आहेत.
यावेळी संस्थेचे सचिव तुळशीराम नवले, बार्टीचे कर्मचारी संगीता शहादे, कुलकर्णी, मुख्याध्यापक शिवाजी माने आदी मान्यवर उपस्थित होते.