दोन हजारच्या नोटा व्यवहारातून गायब ? केंद्र सरकारने लोकसभेत दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१७ मध्ये देशात 500 आणि १००० च्या नोटा बंद करण्यात आल्याची घोषणा केली होती. या ऐतिहासिक निर्णयानंतर सरकारने काही दिवसांतच ५०० आणि २००० हजारच्या नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांच्या नोटा व्यवहारात फारशा दिसत नाहीत. या संदर्भात केंद्र सरकराने लोकसभेत उत्तर दिलं आहे.

काळ्या पैशाला ब्रेक लावण्यासाठी २००० च्या नोटांमध्ये इलेक्ट्रीक चीप लावण्यात आली आहे. तर २००० च्या नोटा बंद होणार असल्याच्या अफवा उडविण्यात आल्या होत्या. मात्र आता केंद्र सरकारद्वारे लोकसभेत २००० च्या नोटांविषयी अधिकृत माहिती देण्यात आली आहे.


लोकसभेत 2000 च्या नोटेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना केंद्र सरकारने स्पष्ट केलं की, गेल्या दोन वर्षांत 2000 ची एकही नोट छापण्यात आलेली नाही. यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं लोकसभेत केंद्राकडून देण्यात आलेलं उत्तर ट्विट केलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.