कोरोना : बाधितांपैकी दोन तृतीयांश पुरूष; तर बळींपैकी 80 टक्के ज्येष्ठ नागरिक

बिजिंग : कोरोना विषाणूंची वाधा झालेल्यांपैकी दोन तृतीयांश रुग्ण हे पुरूष आहे. तर मरण पावलेल्यांपैकी 80 टक्के हे साठ वर्षांच्यापेक्षा अधिक वयाचे आहेत, असे चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या साथित मरण पावचलेल्यांची संख्या 426वर पोहोचली. तर बाधीतांची संख्या 20 हजार 522 झाली आहे, असे चीन सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

या साथीत बाधीत झालेले दोन तृतीयांश पुरूष असून एक तृतीयांश महिला आहेत, असे चीनचे आरोग्य अधिकारी जीआओ याहूई यांनी सांगितले. मरण पावलेल्यांपैकी 80 टक्के हे 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आहेत. बळी पडलेल्या 75 टक्के जणांना हृदयविकार, मधुमेह किंवा कर्करोगाने ग्रासले होते, असे आढळून आले आहे. या विषाणूंच्या बाधेमुळे न्युमोनिया झाल्यास रुग्णाचा धोका वाढू शकतो, असे त्यांनी सांगितले.

आणखी रुग्णालये उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचबरोबर वुहानमधील मृतांची संख्या घटेल, असा आम्हाला विश्‍वास आहे, असे त्या म्हणाल्या. कोरोना विषाणू बाधीतांना हैनान प्रांतात पाच ते 20 दिवस रूग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागत आहे. ते हुबेईमध्ये ही सरासरी नऊ दिवसांची आहे. या प्रांतात चिंताजनक प्रकृती असणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने तेथील दाखल कालावधीच्या सरासरीत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.