नवी दिल्ली : भारतीय सुरक्षा रक्षकांनी जम्मू काश्मीरमध्ये शनिवारी रात्री दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलातील एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Two terrorists have been killed in a joint operation of police, Army&CRPF in Arreh, Kulgam, Jammu & Kashmir. A terrorist has been identified as a foreigner, Ali Bhai. Identification of another terrorist is being ascertained. They were affiliated with Hizbul Mujahideen: Police
— ANI (@ANI) July 4, 2020
कुलगामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं. पोलीस, आर्मी आणि सीआरपीएफच्या जवानांनी एकत्रित केलेल्या कारवाईमध्ये दोन दहशतावदी ठार झाले आहेत. या दोन्ही दहशतावाद्यांची ओळख पटली आहे. या दोघांचाही संबंध हिजबुल या संघटनेशी आहे. यामधील एकाचं नाव अली भाई असून दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चकमक झालेल्या ठिकाणहून शस्त्रास्र आणि इतर सामान जप्त करण्यात आलं आहे.