कोल्हापुरात दोघा गुन्हेगारांकडून घातक शस्त्रे जप्त

देशी बनावटीची 4 पिस्तूल, मॅगझीन आणि आठ जिवंत काडतुसे जप्त

कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघा रेकोर्डवरील गुन्हे गारांकडून देशी बनावटीचे 4 गावठी पिस्तूल, मॅगझीन आणि 8 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. गेल्या पंधरा दिवसांतील कोल्हापूर पोलिसांची बेकायदा बंदुका वापरणारे आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर तिसरी मोठी कारवाई आहे.

एक इसम चंदगड परिसरामध्ये शस्त्रविक्री करायला येणार असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांच्या इचलकरंजीच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्या माहितीनुसार पोलिसांनी चंदगड परिसरात रचलेल्या सापळ्यात चंदगड तालुक्‍यात राहणारा विकी धोंडीबा नाईक आणि कोल्हापुर लक्षतीर्थ वसाहतमध्ये राहणारा सुनील भिकाजी घाटगे या दोघांना ताब्यात घेतले. या दोघंची चौकशी केली तसेच त्यांच्या बॅगेची झडती घेतल्यावर या दोघांकडून 4 देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, 1 मॅगझीन आणि 8 जिवंत राउंड असा 2 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटकेतील दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून कोल्हापूर पोलिसांची आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.