बुलडाण्यात परीक्षेच्या तणावातून दोन विद्यार्थिंनीची आत्महत्या ; एकीची प्रकृती गंभीर

बुलडाणा: दहावीची परिक्षा पुढील महिन्यात सुरू होणार असून या परीक्षेच्या तणावातून तीन शाळकरी मुलींनी आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. ही घटना बुलडाणाच्या खामगाव येथे घडली आहे.

निकिता रोहनकार आणि नयना शिंदे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थीनींची नावे आहेत. तर रुपाली उनोने हिच्यावर उपचार सुरु आहेत. खामगाव येथील अरजण खिमजी नॅशनल हायस्कूलच्या या तिन्ही विद्यार्थीनी आहेत.
तीनही मुली दहावीच्या वर्गात शिकत होत्या. शुक्रवारी सकाळी या तीन मुलींनी दहावीचे प्रात्यक्षिक दिले होते. मात्र परीक्षा कठीण गेल्याने आपण दहावीच्या परीक्षेत नापास होणार अशी भीती तीनही मुलींना वाटत होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या भीतीमुळे या मुलींनी हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने निकिता रोहनकार या मुलीने उंदीर मारण्याची पावडर आणली. निकिताने आणलेले औषध तीनही मुलींनी खाल्ले. मात्र त्रास होऊ लागल्याने तिन्ही मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोन मुलींचा मृत्यू झाला. तर रुपाली उनोनेवर सामान्य रुग्णालय खामगाव येथे उपचार सुरु आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)