गडचिरोली – महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात दोन कट्टर नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या डोक्यावर एकत्रितपणे 10 लाख रुपयांचे बक्षीस होते. अटक केलेल्या नक्षलवाद्यांपैकी एकाला त्याच्या वरिष्ठांनी उत्तर गडचिरोलीतील आपला गट पुनरुज्जीवित करण्यासाठी पाठवले होते. 2021 च्या मर्दिनटोला जंगल चकमकीत येथील नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात खात्मा केला गेला होता.
ज्यामध्ये 27 नक्षलवादी मारले गेले होते. त्याच परिसरात पुन्हा नक्षलवादी चळवळ सक्रिय करण्याचा प्रयत्न हे दोघे जण करीत होते. कृष्णा उर्फ सन्नीराम नरोटे (वय 24) आणि संकुराम नरोटे (22) अशी त्यांची नावे असून त्यांना धानोरा येथील सावरगाव परिसरातून अटक करण्यात आली. या दोघांबद्दल कोणतीही माहिती देणाऱ्यांस राज्य सरकारने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
यातील एकट्या कृष्णाच्या डोक्यावर पोलिसांनी आठ लाखांचे बक्षिस लावले होते. मोर्चुलचा रहिवासी असलेला संकुराम वर 2 लाख रुपयांचे बक्षीस होते.या दोघांचा खून, जाळपोळ आणि गोळीबाराच्या विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग होता, गडचिरोलीतील इतर गुन्ह्यांमध्येही त्यांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.