दोन शिवसैनिक मैदानात; मतदार संभ्रमात 

मराठवाड्यातील हिंगोली हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला. 2014च्या मोदी लाटेतही या मतदारसंघात कॉंग्रेसचे राजीव सातव विजयी झाले. त्यावेळी सातव यांनी शिवसेनेचे त्यावेळचे खासदार सुभाष वानखेडे यांचा पराभव केला. यंदा शिवसेनेने येथे नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर, सुभाष वानखेडे यांनी गेल्या 5 वर्षांत शिवसेना, भाजप आणि आता कॉंग्रेस असा प्रवास करत तिकीट मिळविले आहे. त्यामुळे यंदाची लढत आजी-माजी शिवसैनिकांत होत आहे.

कारण, हे दोन्ही उमेदवार मूळचे कट्टर शिवसैनिक समजले जातात. पण, आता वानखेडे कॉंग्रेसमध्ये गेल्याने त्यांना शिवसेनेची मते कितपत मिळतील हा प्रश्‍न आहे. तर, दुसऱ्या बाजूला हेमंत पाटील हे नांदेडचे असूनही हिंगोलीतून उभे आहेत. त्यामुळे स्थानिक आणि बाहेरचा असा वाद रंगला आहे. पण काहीही असले, तरी ही लढत आजी-माजी शिवसैनिकांत होणार असल्याने मतदार मात्र संभ्रमात सापडले असून यावर ते काय कौल देतात, हे निवडणुकीत ठरेलच.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Aaplamaharashtra says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.