तोफखाना पोलिसांची कारवाई : पाच तासांत आरोपींना घेतले ताब्यात
नगर : सावेडी परिसरातील भिस्तबाग महालाजवळ रात्रीच्या वेळी मारहाण करून लुटणारे दोघे तोफखाना पोलिसांनी अवघ्या पाच तासात जेरबंद केले. त्याच्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
शरद सोपान पवार (वय-21, चेतना कॉलनी, नागापूर), विजय भगवान कुर्हाडे (वय-19 बोल्हेगाव) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, महेंद्र सुधाकर कुलकर्णी (वय-41, रा. ढवण वस्ती, ता.नगर) हे वीज दुरीस्थीची काम करून घरी परतत असतांना त्यांना भिस्तबाग महालाजवळ त्यांना दोघा अज्ञात व्यक्तीने मारहाण करून त्यांच्याकडील पैसे व मोबाईल घेवून पोबारा केला होता.
यात महेंद्र कुलकर्णी जबर जखमी झाले. याबाबत कुलकर्णी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरूण मुलाणी यांनी दोन पथके तैनात करून आरोपींना पाच तासात जेरबंद केले.