सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन पोलीस निलंबित

नाशिक – नाशिकच्या पंचवटीतील विवाहितेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पंचवटीच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. कारभारी काकुळते आणि गोरख रेहरे अशी कारवाई झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

सदरील घटनेप्रकरणी संशयित आरोपी महिलेला घटनास्थळावर घेऊन जात असताना गस्तीवर असलेल्या या दोन पोलिसांनी हा प्रकार बघून विचारपूस केली. मात्र चारशे रुपयांची चिरीमिरी घेऊन हे दोघे पोलीस तिथून निघून गेले, असा त्यांच्यावर आरोप होता.

या प्रकरणाची सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली. या प्रकरणात दोषी आढळताच दोघांवर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, 31 मे च्या मध्यरात्री रिक्षाचालकाने त्याच्या मित्राच्या साथीने एका विवाहितेला तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल, अशी धमकी देत बळजबरी रिक्षात बसवून घेऊन गेले होते. पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड आणि मखमलाबाद परिसरात तिच्यावर अत्याचार केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.