दोन पोलिसांची हत्या करणारे अटकेत

 

पंचकुला – हरियाणातील बुटाना गावाजवळ गस्त घालत असलेल्या दोन पोलिसांची हत्या प्रकरणात फरारी असलेल्या आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.

चौकशी करण्यासाठी आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. आरोपी विकास घुसकानी आणि नीरज पाथरी असे आरोपींची नावे आहेत. आरोपींनी सांगितले की गस्त घालत असलेल्या पोलिसामनी त्यांना मुलींसोबत पकडले होते. यावरून मुख्य आरोपी अमितचा पोलिसांसोबत वाद झाला. याचे रूपांतर हाणामारीत झाले. सर्व आरोपींनी मिळून दोन्ही पोलिसांचे हात-पाय दाबून धरले. त्यानंतर आरोपी अमितने दोन्ही पोलिसांवर चाकूने वार केले. यात रवींद्र आणि एसपीओ कप्तान सिंह या दोन पोलिसांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.