अलास्कामध्ये दोन विमानांची धडक; 7 ठार

वॉशिंग्टन – दोन लहान विमानांची धडक झाल्यामुळे अलास्कामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. नागरी सुरक्षा विषयक प्रादेशिक विभागाच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. 

स्टर्लिंग महामार्गापासून 95 मैलांवर शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडली. यातील एका विमानात एकच व्यक्‍ती होती. तर दुसऱ्या विमानामध्ये 6 जण बसलेले होते. यापैकी एक प्रवासी वगळता अन्य सर्वजण घटनास्थळीच मरण पावले. 

रुग्णालयात नेले जात असताना एका व्यक्‍तीचा मृत्यू झाला. मृतांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या एका आमदाराचाही समावेश असून त्याचे नाव गॅरी नूप आहे. स्थानिक विधिमंडळाचे सभापती ब्राईस एगमन यांनी ही माहिती दिली. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळाने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.