वेगवेगळ्या घटनेत दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू 

जामखेड : तालुक्यातील शिऊर फाटा व तेलंगशी या ठिकाणी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत पाण्यात पडुन दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. बाळु उर्फ प्रकाश श्रावण तुपे रा.बीड, प्रणीता गंगाधर ढाळे रा. तेलंगशी अशी दोन्ही पाण्यात बुडालेल्या मयतांची नावे आहेत.
पोलिसांन कडून मिळालेली माहिती नुसार पहिली घटनेत मयत बाळु उर्फ प्रकाश श्रावण तुपे वय ३० रा. बीड हा एक महीन्यांनपासुन शिऊर फाटा येथील एका हॉटेल मध्ये वेटरचे काम करत होता. मात्र दि ७ डिसेंबर पासुन तो बेपत्ता होता. यानंतर चार दिवसांनी म्हणजे दि ११ डिसेंबर रोजी त्याचा मृतदेह शिऊर फाटा येथील हॉटेलच्या मागिल विहीरी मध्ये पाण्यावर तरंगताना अढळुन आला. घटनेची माहिती मिळताच सपोनि अवतारसिंग चव्हाण व पो.ना.अजय साठे यांनी भेट दिली व शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयत दाखल केला.
पोलिसांनी घटनेची माहिती त्याच्या आई वडीलांना दिल्या नंतर त्याचे नातेवाईक रुग्णालयत दाखल झाले. या प्रकरणी हॉटेल मालक विठ्ठल ज्ञानदेव देवकाते यांनी दिलेल्या खबरीवरुन जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना ही तालुक्यातील तेलंगशी या ठिकाणी घडली. या मध्ये शुक्रवार दि १३ रोजी रात्री तेलंगशी येथील अर्जुन बाबु जावळे यांच्या शेतातील विहिरीत कु. मयत प्रणीता गंगाधर ढाळे वय १७ रा. तेलंगशी या कॉलेज तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
प्रणीता ही इयत्ता अकरावी मध्ये शिकत होती. दुपारी शेळ्या चारण्यासाठी ती शेतात गेली होती मात्र विहिरीजवळ अचानक पडल्याने तीचा पाण्यात पडुन मृत्यू झाला. सायंकाळी ती घरी न आल्याने तीची घरच्यांनी शोधाशोध केली विहीरी जवळ तीच्या चपला आढळून आल्याने ती पाण्यात बुडाली आसल्याचे लक्षात आले.
 मयताचे चुलते मोहन नरहरी ढाळे यांना ही घटना समजताच त्यांनी सदरचा मृतदेह विहीरी बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयत दाखल केला. या प्रकरणी मोहन नरहरी ढाळे यांनी दिलेल्या माहितीवरून जामखेड पोलिस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या दोन्ही घडलेल्या वेगवेगळ्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)