काविरोधी निर्शनात हिंसाचार : दोघांचा मृत्यू

मुर्शीदाबाद : प. बंगालच्या मुर्शीदाबाद जिल्ह्यातील जलगी गावात सुधारीत नागरिकत्व कायद्या (का) विरोधातील निदर्शकांच्या दोन गटात झालेल्या हिंसाचारात दोन जण मरण पावले. अनेक जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

भारतीय नागरिक मंचने साहेबनगर भागात बंद पुकारला होता. त्यावेळी हा हिंसाचार झाला. यावेळी अनेक जण जखमी झाले. त्यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनरूल विश्‍वास आणि सलाउद्दीन शेख हे दोघे मरण पावले. या हिंसाचाराची सुरवात झाली त्यावेळी क्रुडबॉम्बचा वापर केल्याचे सांगण्यात येत होते. अनेक गोळ्या झाडल्याचे आवाज आले. या घटनेनंतर येथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.