भीमाशंकर येथील नागफणी पॉईंटवरून दोन जण कोसळले दरीत

पुणे – भीमाशंकर येथील नागफणी पॉईंट वरून तब्बल ३०० ते ४०० फूट खोल दरीत दोन अनोळखी व्यक्ती पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातील एक तरुणी असून तिचा मृतदेह पोलिसांना ४०० फुटांवर दिसला असून मृतदेह वर काढण्याचे काम सुरु आहे तर तरुण अद्याप सापडलेला नाही.

एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिक तरुणाचा शोध घेत आहेत. हे दोघे कोण आहेत किंवा कोठून आले याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)