नाशिक – नाशिक येथे सुरु असलेल्या 94 व्या अखिर भारतीय मराठी साहित्य संमेलनात करोनाचा शिरकाव झाला असून दोघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळ रॅपिड अॅंटिजन टेस्टमध्ये पुणे येथून आलेल्या दोन प्रकाशकांची करोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.
आद्य साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नगरीत गेल्या तीन दिवसांपासून 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सरु आहे. तारीख जाहीर झाल्यापासूनच संमेलन संकाटाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यातच आता संमेलनाच्या प्रवेशद्वारावर करोनाने धडक दिली आहे. दोघे प्रकाशक पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.
भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात तीन दिवासांपासून सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची आज सांगता होणार आहे. परंतु, अखेरच्या दिवशी दोघे पाॅझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मागच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचे रूग्ण सापडल्यानंतर जभरात चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सर्वच देशांना सर्कतेचा इशारा दिला आहे. भारतातही ओमायक्रॉनचे आतापर्यंत 6 रूग्ण सापडले आहेत. त्यातील एक रूग्ण महाराष्ट्रातील आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे देशासह राज्यातही कडक निर्बंध घालण्यात आले आलेत. असे असताना संमेलनस्थळी अनेकांच्या चेहऱ्यावर मास्त नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले आहे. गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.