उरूळी कांचनमध्ये आढळले दोन रुग्ण

सोरतापवाडी  -उरुळी कांचन (ता. हवेली) येथे पुन्हा दोन बाधित आढळले असून त्यांच्या संपर्कातील 12 जणांना होम क्वारंटाइन केल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सुचेता कदम यांनी दिली.

चाळीस वर्षीय व्यक्ती मुंबईहून आल्यावर थंडी-ताप आल्याने त्यांनी उरुळीतील एका दवाखान्यात उपचार घेतले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची चाचणी केली असता, ते पॉझिटिव्ह आढळले.

दुसरा 27 वर्षीय तरुण हा कामानिमित्त पुण्यातील भवानी पेठेत पंधरा दिवस होता, तेथून तो आल्यावर आईने त्याला चाचणी करण्यास सांगितले असता तो पॉझिटिव्ह आढळला आहे.

त्यांच्या संपर्कातील बारा जणांना होम क्वारंटाईन केले असून त्यांचे स्वॅब सोमवारी तपासणीसाठी पाठविणार आहेत. मुलाला लोणी काळभोर तर दुसऱ्या बाधिताला ससूनमध्ये दाखल केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.