नगरसेवकांच्या निधीतून दोन ऑक्‍सिजन प्लान्ट : चंद्रकांत पाटील

दहा दिवसांत 2 हजार ऑक्‍सिजन बेड्‌स तयार करणार 

पुणे – राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे. येत्या दहा दिवसांत पुणे शहरात दोन हजार ऑक्‍सिजन बेड्‌स तयार करणार असून, नगरसेवकांच्या निधीतून दोन ऑक्‍सिजन प्लान्टही उभे करण्यात येणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. करोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतील एक कोटी खर्च करण्याला परवानगी दिली. तर, मी माझा सगळाच निधी करोनासाठी खर्च करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या वतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था याठिकाणी 450 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरला पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारच्या हाताबाहेर परिस्थिती गेल्यामुळे सरकारने सोपा मार्ग स्वीकारला, व्यवस्था काहीच करायची नाही आणि सगळ केंद्रावर ढकलून द्यायचे. राजकारण आम्हालाही येते, त्यात माहीर आहोत. मात्र, आता ही परिस्थिती नाही.

पुणे शहरात येत्या दोन दिवसांत 40 बेड्‌सचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तर, येत्या दहा दिवसांत 2 हजार ऑक्‍सिजनयुक्‍त बेड्‌स तयार करण्यात येणार आहे. मोबाइल टेस्टींग लॅबही काही दिवसांत कार्यान्वित होणार आहे. तर नगरसेवकांच्या स्वनिधीतून 2 लाख 20 रुपये काढून दोन ऑक्‍सिजन प्लान्ट उभे करणार आहे.

– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष व आमदार भाजप

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.