उंब्रज – कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात करोनाबाधित झालेल्या उंब्रज (ता. कराड) येथील परिचारिकेचे 53 वर्षीय वडील तर निकट सहवासातील असलेल्या उंब्रज येथील 22 वर्षीय युवक यांचा दुसऱ्यांदा पाठवण्यात आलेला स्त्रावाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. या दोन पॉझिटिव्इ रुग्णांमुळे उंब्रजमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उंब्रजचा करोनाबाधितांचा आकडा चारवर पोहचला आहे. तर कराड तालुक्यात करोनाचे 97 रूग्ण झाले आहेत. उंब्रजचे बाधित रूग्ण क्वारंटाइन होते. त्यांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत.
त्यांच्या निकट सहवासीत 9 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असणारी उंब्रज येथील चोरेरोड परिसरातील युवती करोनाबाधित झाली. यावेळी तिचे आई-वडील व निकट सहवासातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले होते. ही युवती शुक्रवारी दि. 15 रोजी करोनामुक्त झाली. तिच्या आई-वडीलांसह निकट सहवासातील पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर 14 दिवसांनी पाठवण्यात आलल्या स्त्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उंब्रज गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.