डीएसपी म्युच्युअल फंडांचे दोन नवी इंडेक्स फंड

अमर्यादित कालवधीसाठी (ओपन एन्डेड) सुरु राहणाऱ्या दोन इंडेक्स योजना डीएसपी म्युच्युअल फंडाने बाजारात आणल्या असून ११ फेब्रुवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत या योजना दहा रुपये एनएव्हीने गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असतील. त्यानंतरही या योजनांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. निफ्टी आणि निफ्टी नेक्स्ट फिफ्टी या नावाने या योजना बाजारात आणण्यात आल्या आहेत.

निफ्टीमध्ये भारतातील भांडवली मूल्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठ्या ५० कंपन्यांचा समावेश होतो. त्यामुळे निफ्टी या योजनेत विविध क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे. निफ्टी नेक्स्ट फिफ्टीमध्ये भांडवली मूल्याच्या आधारे पुढील म्हणजेच ५१ ते १०० कंपन्यांचा समावेश होतो. त्यानुसार त्यातील पुढील काळात मोठ्या प्रमाणावर भांडवली मूल्य (मेगा कॅप) वाढू शकेल अशा कंपन्या निवडून त्यामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. सेबीच्या व्याख्येनुसार या दोन्ही योजना या लार्जकॅप वर्गातील असतील. या दोन्ही योजनांचे व्यवस्थापन गौरी सेकारिया यांच्याकडे असणार आहे. त्या २०१७ पासून डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेडच्या ईटीएफ आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट विभागाच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत.

निफ्टी नेक्स्ट फिफ्टी म्हणजे काय?

निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स म्हणजे निफ्टी ५० मधील पन्नास कंपन्या वगळून निफ्टी हंड्रेडमधील ५० कंपन्यांमध्ये केली जाणारी गुंतवणूक. निफ्टी नेक्स्ट फिफ्टी १ जानेवारी १९९७रोजी सुरू करण्यात आला आहे. फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनचे तत्व यामागे आहे. त्यानुसार निर्देशाकांतील कंपन्यांचे बाजारातील भांडवली मूल्य फ्री फ्लोट पद्धतीने मोजले जाते. त्यानुसार भांडवली मूल्य मोजताना कंपनीच्या शेअरचा भाव गुणिले बाजारात कंपनीचे सहजगत्या उपलब्ध शेअर असा हिशेब केला जातो. यामध्ये पूर्ण भांडवली मूल्याच्या सगळ्या अॅक्टिव्ह आणि इनअॅक्टिव्ह शेअरचा विचार केला जात नाही. फ्री फ्लोट पद्धतीत कंपनीतील इनसायडर, प्रवर्तक आणि सरकारी मालकीचे असे लॉक्ड इन शेअर वगळून अन्य शेअरच्या संख्येचा विचार केला जातो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)