कट्टर नक्षलींना ‘अटक’; पकडून देणाऱ्याला जाहीर केलं होतं 5 लाखाचं ‘बक्षिस’

रायपुर – छत्तीसगड मधील बिजापुर जिल्ह्यात दोन कट्टर नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोरसा दासरू वय 45 आणि सत्यम कट्टम अशी त्यांची नावे आहेत.

यातील कोरसा नावाच्या नक्षलवाद्याला पकडून देण्यासाठी पाच लाख रूपयांचे बक्षिस लावण्यात आले होते. तो माओवाद्यांच्या मुख्य समितीचा सदस्य आहे. त्याला शुक्रवारी गंगलुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्याच्या मुळ गावी पकडण्यात आले.

या दोघांवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, सरकारी वाहने जाळणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. कोरसाला पकडण्यासाठी आत्ता पर्यंत 17 वेळा वॉरंट्‌स जारी करण्यात आली आहेत.

त्यामुळे तो पकडला जाणे हे पोलिस व सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. कोरसाच्या तुलनेत कट्टमवर मात्र कमी गुन्हे दाखल आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.