-->

लव्ह जिहाद: मुलीच्या ‘त्या’ जबाबानंतर दोघांची सुटका

मोरादाबाद – उत्तरप्रदेशातील मोरादाबाद येथे काहीं दिवसांपुर्वी अटक करण्यात आलेल्या दोन बंधुंची सुटका करण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे. हे मुस्लिम समाजाचे आहेत.

त्यापैकी एकाचे लग्न हिंदु मुलीशी ठरले होते त्यासाठी ते रजिस्ट्रारच्या कार्यालयात विवाह नोंदणीसाठी गेले होते. त्यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवून धर्मांतर बंदी कायद्यानुसार तुम्ही या विवाहाला जिल्हाधिकाऱ्यांची अनुमती घेतलेली नाही असा आक्षेप नोंदवत त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. रशीद आणि सलीम अशी अटक करण्यात आलेल्या दोन बंधुंची नावे आहेत. त्यापैकी रशीद नावाच्या युवकाशी पिंकी नावाच्या हिंदु धर्मिय मुलीचा नोंदणी पद्धतीने विवाह होणार होता या पिंकीने सांगितले की आपल्यावर धर्मांतर करण्यासाठी कोणीही दबाव आणलेला नाही. तिच्या जबाबानंतर कोर्टाने त्यांना सोडण्याचा आदेश दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.