पाचवडमध्ये दोन मोटरसायकलची चोरी

कराड – पाचवड फाटा (ता. कराड) येथील आमराई गार्डन ढाब्याच्या पाठीमागे उभी केलेली हिरो एचएफ डीलक्‍स कंपनीची मोटरसायकल अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद संभाजी मच्छिंद्र साठे (रा. नांदगाव, ता. कराड) यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

संभाजी साठे यांनी सोमवारी दुपारी आमराई गार्डन ढाब्यावर जेवायला जाताना ढाब्याच्या पाठीमागे त्यांनी मोटरसायकल (एमएच 50 पी. 2162) उभी केली होती. जेवण झाल्यानंतर गाडी घेण्यासाठी गेले असता गाडी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत साठे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.