साताऱ्यातील युवकासह आणखी दोन पाँझिटिव्ह; दिवसभरात २२ जण पॉझिटिव्ह

चिंताजनक; जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ११४ वर

सातारा (प्रतिनिधी) – सातारा व कराड येथे प्रत्येकी एक याप्रमाणे रात्री उशिरा दोघांचे करोनि रिपोर्ट पाँझिटिव्ह आले. जिल्ह्यात आज दिवसभरात २२ तर आतापर्यंत एकूण ११४ करोनाबाधित झाले आहेत. खावली (सातारा) येथे संस्थात्मक विलगीकरण केलेला 18 वर्षीय युवक आणि कराड येथील करोनाबाधिताच्या निकट सहवासातील ५९ वर्षीय पुरुषाचा अहवाल करोना पाँझिटिव्ह (कोविड-19) आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. त्यामुळे आज दिवसभरात जिल्ह्यात २२ करोनापाँझिटिव्ह आले. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ११४ झाली आहे.

१८ वर्षीय युवक हा तीन दिवसांपूर्वी विनापरवानगीने मुंबईहून आला होता. पोलीसांनी त्यांचावर गुन्हा दाखल केला असून सातारा तालुक्यातील खावली येथे संस्थात्मक विलगीकरणामध्ये त्याला ठेवण्यात आले होते. त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. हा मुलगा करोनाबाधित असल्याचा अहवाल पुणे येथून प्राप्त झाला आहे. तर कराड येथील ५९ वर्षीय पुरुष हा करोना बाधित व्यक्तीचा निकट सहवासातील आहे. आताचा १८ वर्षीय तरुण कोडोली (सातारा) येथील असून कोडोली गाव सील करुन उपाययोजना सुरु केली आहे. संपर्कातील काही जणांना क्वारंटाइन केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या ११४ झाली असून यापैकी ९८ बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. १४ जण करोनामुक्त होऊन घरी गेले. दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.