मुंबई – बॉलिवूड निर्माते आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती ‘बोनी कपूर’ यांच्या घरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यामुळे संपूर्ण परिवाराला क्वारंटाईन मध्ये राहण्याची वेळ आली आहे. बोनी कपूर यांच्या घरी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. या संदर्भात बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर हिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पत्रक शेअर केलं होते. आता त्यापाठोपाठ त्यांच्या घरातील आणखी दोन व्यक्तींची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरात काम करणाऱ्या आणखी दोन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या बोनी कपूर हे त्यांची आणि दोन्ही मुलींची काळजी घेत आहेत. तसेच घरातील सर्व सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बोनी कपूर यांच्या निवासस्थानी म्हणजेच लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला (वय 23) कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून हा तरुण अतिशय आजरी होता. त्यानंतर कपूर यांनी त्याला कोरोनाची चाचणी करण्यास सांगितलं होत. दरम्यान, या तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीएमसी आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडून त्या तरुणाला क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आलं.