थिरूअनंतपूरम – झिका विषाणूच्या संसर्गाचे आणखी दोन संसर्गित केरळमध्ये सापडले. त्यामुळे बाधितांची संख्या 21 वर पोहोचली आहे. हा संसर्ग रोखण्याच्या योजनेवर केरळ सरकार प्रयत्न सुरू असल्याचे केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
पूनथुरा येथील एका 35 वर्षीय आणि सस्थमंगलम येथील 35 वर्षीय व्यक्तीला हा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या माहितीला जॉर्ज यांनी दुजोरा दिला आहे. यापुर्वी एक 73 वर्षीय वृध्द महिलेला हा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.
पुण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवलेल्या पाच नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे जॉर्ज यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
झिका विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केरळ सरकार कृती आराखडा बनवत असून परिस्थितीवर राज्य सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला प्रतम या विाषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते.
तिने एका मुलांला जन्म दिला असून दोघांची प्रकृती उत्तम असल्याचे केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले. ताप, पुरळ आणि अंगदुखी असणाऱ्या रुग्णांच्या आणि विशेषत: गर्भवती महिलांची ही चाचणी करण्याचे आदेश रुग्णालयांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.