बायडेन प्रशासनात आणखी दोन भारतीयांना स्थान

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या प्रशासनात चिराग बेन्स आणि प्रोनिता गुप्ता या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना स्थान दिले आहे. त्यामुळे बायडेन प्रशासनात भारतीयांचा दबदबा आणखी वाढला आहे. बायडेन प्रशासनात आतापर्यंत 55 भारतीय वंशाच्या लोकांना स्थान दिल्याचे दिसून आले आहे.

व्हाईट हाऊस प्रशासनाने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये चिराग बेन्स यांना क्रिमिनल जस्टिससाठी राष्ट्राध्यक्षांचे विशेष सहाय्यक म्हणून नियुक्त केले आहे आणि प्रोनिता गुप्ता यांना कामगारांच्या संबधित क्षेत्रासाठी राष्ट्राध्यक्षांचे विशेष सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याचसोबत अतिरिक्त 20 सदस्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यामध्ये करोना रिस्पॉन्स टीम, वातावरण बदल धोरण, इंटरनल निती परिषद आणि राष्ट्रीय आर्थिक परिषद या क्षेत्रामध्ये काही सदस्यांची नियुक्ती केली आहे.

व्हाईट हाऊसने आपल्या निवेदनात सांगितलंय की, देशासमोरील असलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी बायडेन प्रशासनाने योग्य व्यक्तींची नियुक्ती केली आहे. त्यामाध्यमातून बायडेन प्रशासन देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.