भोर -भोर तालुक्याचे करोनाचे ग्रहण काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे. मंगळवारी (दि. 26) आणखी दोन गावातील रुग्णाचे अवाहल पॉझिटिव्ह आले असून रुग्णाची संख्या आठवर पोहोचली असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
वरवडी खुर्दमधील धनावडेवातील 22 वर्षीय व रायरी ग्रामपंचायत हद्दीतील धारांबेवाडी येथील 27 वर्षीय तरुणाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे दोघेही आठ दिवसांपूर्वी मुंबईहून गावी आले होते. त्यामुळे धनावडेवाडीतील 5 तर धारांबे वाडीती 9 अशा एकूण 14 जणांना पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, बाधित रुग्ण क्वारंटइन असताना देखील त्याचे अवाहल पॉझिटिव्ह आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दोन्ही गावात प्रांतधिकारी राजेंद्र कुमार जाधव, पोलीस निरीक्षक राजू मोरे, गटविकास आधिकारी विशाल तनपुरे, तहसीलदार अजित पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत काऱ्हळे आदींनी भेट देत तीन किलो मीटरचा परिसर सील केला आहे.