पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते रुग्ण लक्षात घेऊन काल (सोमवारी) 16 परिसर सील करण्यात आले होते. आज ज्या परिसरातील रुग्ण आढळले ते दोन्ही परिसर आज (मंगळवार दि. 28) रात्री अकरापासून सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
सोमवारी सायंकाळी वाकड आणि पिंपरीतील रुग्ण आढळून आल्यानंतर हे परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिसर सील केलेल्यामध्ये तपोवन मंदिर पिंपरी, सुखवानी सिटी, व्होडाफोन स्टोअर्स, नंद किराणा, ज्ञानेश्वर जनरल स्टोअर्स, कापसे चौक, माऊली चहा, वाडेकर मिसळ या पिंपरीगावातील परिसराचा समावेश आहे.
तर 16 नंबर बस स्टॉप, काळेवाडी फाटा, वाकड हा दुसरा परिसर सील करण्यात आला आहे. यामध्ये प्रोक्स सॉफ्टवेअर, औंध- रावेत बीआरटीएस रोड, प्रेम कुल्फी, इंडियन बॅंक, अक्षय पार्क हा परिसर आज रात्री 11 वाजलेपासून पुढील आदेश येईपर्यंत सील केला जाणार आहे.