मेढा : महाबळेश्वर ते सातारा रस्त्यावरील केळघर घाटात आज सायंकाळी सहाच्या दरम्यान साप (ता. कोरेगाव) येथील दोघेजण मोटार सायकलवरून ताबा सुटल्याने दरीत कोसळले असून त्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या टीमसह महाबळेश्वर टेकर्स यांची शोधमोहीम सुरू होती.