मुंबई – गार्डनमध्ये खेळत असताना मुंबईत दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील अँटॉप हिल परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. हे बालके खड्ड्यात पडल्याचे कळताच येथील नागरिकांनी धाव घेत दोन्ही मुलांना बाहेर काढले आणि त्यानंतर सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
Two minor boys, 11 years old and 9 years old, drown after falling into a pit dug up for repair of water supply line in Antop Hill area of Mumbai today evening: BMC
— ANI (@ANI) October 25, 2021
यशकुमार, वय १२ आणि शिवम, वय ९ असे मृत चिमुकल्याची नावे आहेत. शिवम व यशकुमार दोघे गार्डनमध्ये खेळत होते. त्या भागात पाईपलाईन दुरुस्तीसाठी एक खड्डा खोदण्यात आला होता. हे दोघं खेळता-खेळता त्या खड्ड्यात जाऊन पडले. या खोल खड्ड्यात पाणी असल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाला आहे.
पाईपलाईनच्या दुरुस्तीकरीता खोदकाम करण्यात आलेल्या या खड्ड्याजवळ कुठलेच बॅरेकेड्स लावण्यात आला नाही. शिवाय या खड्ड्यात पाणी सुद्धा साचले होते. त्यामुळेच या चिमुकल्यांचा मृत्यू झाला असा आरोप मृत बालकांच्या पाल्यांनी केला आहे.