फिनिक्‍स मॉलमधून दोन लाखांची घड्याळे चोरली

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे – फिनिक्‍स मॉलमध्ये मोकळ्या जागेत ठेवलेल्या काउंटरमधून दोन लाखांची घड्याळे चोरण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

श्रीपाद जिंदे ( वय 35, रा. सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीचे मॉलमध्ये मोकळ्या जागेत घड्याळाचे काउंटर आहे. या काउंटरमधून जिऑडोने कंपनीची पुरुषांची पाच आणि स्त्रीयांची 22 मनगटी घड्याळे 2 लाख 9 हजार रुपयांची चोरण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.