दंतवाडा – छत्तीसगडमधील दंतवाडा जिल्ह्यात दोन नक्षलवाद्यांनी आत्मसर्मपण केले आहे. या दोन्ही नक्षलवाद्यांवर रोख बक्षीस होते, अशी माहिती संबंधित अधिका-यांनी दिली. हिदामा मांडवी आणि मंगु मांडवी असे आत्मसर्मपण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. या दोघांनी दंतवाडाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांच्यासमोर शनिवारी रात्री शरण आले.
सीपीआय या माओवादी संघटनेत हिदामा हा 1997पासून कार्यरत आहे. दंतवाडा जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या पुरवठा पथकाचा प्रभारी म्हणून कार्यरत असल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितले. यापूर्वी 2017मध्ये त्याला अटक करण्यात आली होती.
त्यावेळी तीन महिन्यांची शिक्षा सुनाविण्यात आली होती. ही शिक्षा भोगल्यानंतर तो पुन्हा नक्षली कारवायांमध्ये सक्रीय झाला होता. त्यानंतर त्याला पुरवठा पथकाच्या प्रभारीपदी नियुक्त करण्यात आले होते.