दोन जीव गेले तरी शहाणपण नाही आले

शहरात ठिकठिकाणी असुरक्षित खड्डे : लहान मुलांच्या जीवाशी खेळ

पिंपरी  – दापोडी येथे अमृत योजनेअंतर्गत खोदलेल्या खड्ड्यात पडून एका कामगाराचा मृत्यू आणि त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू झाला होता. या खड्ड्यात तब्बल सहा जण अडकले होते. यांना वाचविताना एक अग्निशामक दलाच्या जवानाचाही मृत्यू झाला होता. एक कामगार आणि एक जवान गमावूनही पालिका प्रशासनाला शहाणपन आलेले दिसत नाही.

अजूनही वेगवेगळ्या कामासाठी शहरात असंख्य खड्डे खणलेले दिसत आहेत. विशेषतः ज्या भागातही दुर्घटना घडली, त्याच्याजवळच असलेल्या सांगवी, पिंपळे गुरव परिसरात अशाच प्रकारचे धोकादायक खोदकाम सर्वत्र दिसून येत आहे.

दापोडीतील दुर्घटनेमुळे शहरासोबतच राज्यभर खळबळ उडाली होती. या घटनेच्या आठवणी अजूनही ताज्याच आहेत, परंतु पालिका प्रशासन आपल्या ठेकेदारांना सुरक्षेसंबंधी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यास भाग पाडत नाही. विशेषतः पिंपळे गुरव परिसरात असे अनेक खड्डे दिसत आहेत. आश्‍चर्याची बाब म्हणजे ठेकेदारांकडून सुरु असलेल्या संथ गतीच्या कामांमुळे अनेक महिने खड्डे तसेच असतात. या परिसरात आधीच खणलेले रस्ते दुरुस्त झालेले नाहीत आणि रोज नवीन ठिकाणी रस्ते खोदून खड्डे तयार करण्यात येत आहेत.

पिंपळे गुरव येथे सुरु असलेल्या विविध विकासकामे अपघातासाठी निमंत्रण बनत आहेत. येथे खोदकाम केलेल्या कामाजवळ कुठलीही सुरक्षात्मक उपाययोजना केलेली नाही. यामुळे लहान मुले धोकादायकरित्या येथील खडडयात उतरत आहेत. यामुळे परत दापोडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेली कामे काही संपत नाही आणि सुरक्षेची उपाययोजनाही होत नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.