पिंपरी – पार्टी करण्यासाठी दोन हजार रुपये दिले नाही म्हणून दोन जणांनी एका तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून दोन लाखांचा ऐवज लुटून नेला. ही घटना बुधवारी (दि. 18) रात्री साडेदहा वाजता गणेशनगर, बोपखेल येथे घडली. आशिष अजय शर्मा (वय 25, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अरविंद रमेश जोगदंड (वय 28), अतिष शिंदे (वय 27, दोघेही रा. गणेशनगर, बोपखेल) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी आशिष यांच्याकडे पार्टीसाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. मात्र आशिष यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण केली व आशिष यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची दोन लाख रुपये किंमतीची सोनसाखळी आणि पाच हजार रुपयांचा मोबाइल फोन असा एकूण दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला.