दोन लाखांची दारू जप्त 

नगर  – नगर-सोलापूर रस्त्यावर अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून 2 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही कारवाई गुरुवार (दि.27) रोजी करण्यात आली.

आरोपी सचिन सुरेश घोरपडे (वय-38, रा. छत्रपती चौक, कडा ता. आष्टी जि. बीड) यास ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहिती नुसार अवैधरीत्या विदेशी दारुची वाहतूक सचिन सुरेश घोरपडे हा त्याच्या वाहन (नं. एम.एच. 23 ई. 5415) मधून विदेशी दारु घेऊन, नगर-सोलापुर रस्त्याने कडा ता.आष्टी येथे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार यापथकातील रवींद्र कर्डीले, सचिन आडबल, संदीप पवार यांनी कोठी चौकात सापळा रचवून आरोपीस ताब्यात घेतले. यामध्ये 13 हजार 200 रुपये किंमतीची विदेशी दारु व दारु वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन 2 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकून 2 लाख 13 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.