पिंपळे गुरव येथील मंदिराचा स्लॅब कोसळून दोन मजूर गंभीर जखमी

पिंपरी-चिंचवड : आज दुपारी चारच्या सुमारास पिंपळे गुरव येथील स्मशान भूमिजवळ असलेल्या शंकर मंदिराचा स्लॅब कोसळल्याने दोन कामगार मलब्याखाली अडकून गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही दिवसांपासून पवना नदी शेजारील शंकर मंदिराचे बांधकाम सुरु असून आज या मंदिराचे काम सुरु असतानाच अचानक स्लॅब कोसळल्याने बांधकाम करत असलेले दोन मजूर कोसळलेल्या स्लॅबच्या मलब्याखाली अडकले.

या दुर्घटनेची माहिती येथील माजी नगरसेवक शंकर जगताप यांना समजताच त्यांनी आपल्या मित्रपरिवारासह घटनासथळी धाव घेत मलब्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढत त्यांना पुढील उपचारांसाठी वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल केले. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या दोन्ही कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.