राहाता – अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. एकाची ओळख पटली मात्र दुसरा युवकाची ओळख अद्याप झाली नाही. कोपरगाव नाक्याजवळ शुक्रवारी पहाटे तीन वाजता हा अपघात झाला. डेसे शंकर कमरू (वय 20 रा.निरोली मध्य प्रदेश) त्याच्या सोबत असलेला साथीदार नाव माहित नाही. या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झालेल्या ठिकाण या युवकांच्या मृतदेहाची दुरावस्था झाली होती.
वाहनाने जोराची धडक देऊन या युवकांच्या अंगावरून टायर गेल्याने अपघाताच्या ठिकाणी रक्त मोठ्या प्रमाणावर साचले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोन युवकांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालय नेले. एका युवकाची ओळख पटली, मात्र दुसऱ्याची ओळख झाली नाही. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दिलीप मंडलिक करीत आहेत पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.