वर्धा – ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दहा मजूर जखमी झाले आहेत. ही घटना देवळी तालुक्यातील अडेगाव शिवारात घडली आहे. जखमींवर सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर मजुरांना घेऊन देवळी कडून सोनेगावकडे जात होते. यावेळी ट्राॅली आणि मुंड्याला जोडणारा ट्रॅक्टरचा हायड्रोलिक राॅड तुटला. भरधाव ट्रॅक्टर झाडावर जाऊन आदळून पलटी झाले. ट्रॅक्टरचा मुंडा झाडावर आदळल्याने चालक आणि मजूर जखमी झाले असून अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत.