मुंबई : पुण्यातील एक कौटुंबिक कार्यक्रम संपवून मुंबईला घरी परतत असताना कॅब डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात दोन जेष्ठ नागरिक मरण पावले. रविवारी रात्री हा अपघात झाला.
कॅब चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने खोपोली येथे रस्त्याच्या दुभाजकाला गाडी घासली. गाडीत अडकलेल्यांची सुटका स्थानिकांनी केली. त्यांना रुग्णालयात हलवले. तेथे दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मोतिराम मोतीवाला (वय 70) आणि त्यांनी पत्नी उशा (वय65) अशी मृतांची नावे आहेत.
दोन वार्षाच्या एका तान्हुल्यासह अन्य तीन जण या अपघातात जखमी झाले. त्यांना नवी मुंबईच्या महात्मा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त सर्व जण अंधेरीतील चकाळा भागातील रहिवासी आहेत.