नगर-मनमाड रस्त्यावरील अपघातात दोन ठार, चार जखमी

राहुरी तालुक्‍यातील शिंगणापूर फाट्याजवळील घटना

राहुरी: नगर-मनमाड रस्त्यावरील राहुरी तालुक्‍यातील शिंगणापूर फाट्याजवळ दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. दुपारी साडेचार चे दरम्यान झालेल्या या अपघातात दोनजण जागीच ठार झाले तर चारजण गंभीर जखमी झाले. मयत हे पुणे जिल्ह्यातील असल्याचे समजते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत अधिक अशी की, आज सायंकाळच्या सुमारास बोलेरो व ट्रक या दोन वाहनांचा शिंगणापूर फाट्यावर समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात बोलेरो जीपमधील दोघेजण जागीच ठार झाले. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, बोलेरोचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी नगरमध्ये हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, बाभळेश्‍वर येथील पोलिस मदत केंद्रातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताने वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्त्याच्या दुर्तफा दोन अडीच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त वाहने हटविण्यासाठी क्रेनची मदत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)