नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील बारजुल्ला भागात जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशवताद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#WATCH Terrorist opens fire in Baghat Barzulla of Srinagar district in Kashmir today
( CCTV footage from police sources) pic.twitter.com/FXYCvQkyAb
— ANI (@ANI) February 19, 2021
या हल्ल्यानंतर घटनास्थळाच्या आसपासचा परिसर जवानांनी सील केला असून, शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून जवानांकडून दहशतवाद्यांविरोधात जोरादरा मोहीम राबवली जात आहे, अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामुळे दहशतवादी संघटना अधिकच चवताळल्या असल्याचे दिसत आहे.
या अगोदर शोपियांमधील बडगाममध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे या चकमकीत ठार झालेले तिन्ही दहशतवादी हे लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते.