-->

इसिसचे दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : रविवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इसिसशी संबंधित संशयित दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

दोघांनाही दिल्लीच्या ओखला भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघे पती – पत्नी असल्याची  माहिती मिळते आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीचे नाव जहानजेब सामी आणि पत्नीचे नाव  हिंदा बशीर बेग आहे. दोघांकडून संवेदनशील साहित्यही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही संशयित पती-पत्नी दिल्लीत आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.