नगर – नगर-औरंगाबाद महामार्गावर इंद्रायणी हॉटेल समोर टेंम्पो-दुचाकीच्या धडकेत दोघे जखमी झाल्याची घटना सोमवार (दि.12) रोजी सकाळी आकराच्या दरम्यान घडली. नगर तालुक्यातील सांडवा-मांडवा येथील भास्कर पिंपळे (पूर्ण नाव माहिती नाही), व यांच्यासह एक महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने 108 रुग्णवाहीकेने प्रथम उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.