न्यूयॉर्क – अमेरिकेच्या सीमेतून त्या देशात बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांना नुकतीच तेथे अटक करण्यात आली. अमेरिकेच्या सीमा निरीक्षण पथकाने बुर्के आणि मस्सेना सीमास्थानक परिसरात घुसखोरी करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली त्यात दोन जण भारतीय आहेत.
हे चौघे जण स्मगलिंगच्या इराद्याने तेथे घुसले होते. त्यांच्या वाहनांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्यातील चौघांची ओळख पटवण्यात आल्यानंतर त्यात दोन जणांकडे भारतीय पारपत्रे आढळून आली. त्यातील एक जण इटलीचा आहे. चौथ्या इसमाची मात्र अजून ओळख पटू शकलेली नाही. त्यांच्यावर ज्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यात पाच वर्षांच्या शिक्षेच्या कालावधीची तरतूद आहे.