लाहोर -पाकिस्तानी यंत्रणांनी सोमवारी दोन भारतीय नागरिकांना अटक केली. त्यांनी घुसखोरी केल्याचा कांगावा पाकिस्तानकडून केला जात आहे. प्रशांत (मध्यप्रदेश) आणि धारीलाल (तेलंगण) अशी अटक करण्यात आलेल्या भारतीयांची नावे सांगण्यात आली आहेत.
दोघांपैकी एकजण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्यांना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पकडण्यात आले. त्यांच्याकडे प्रवासासाठी आवश्यक वैध कागदपत्रे आढळली नाहीत, असे चित्र पाकिस्तानी पोलीस रंगवत आहेत.
त्या भारतीयांना एखाद्या घातपाती कारवाईसाठी पाठवले गेले असू शकते, असा संशयही पाकिस्तानी यंत्रणा घेत आहेत. याआधी ऑगस्टमध्ये पाकिस्तानने एका भारतीय हेराला अटक केल्याचा दावा केला होता. मात्र, त्यासंबंधीची इतर कुठली माहिती पाकिस्तानने अजूनपर्यंत उघड केलेली नाही.