नेवासा फाटा येथे दोन तास वाहतूक कोंडी

लग्नतिथी, आठवडे बाजारामुळे वाहनांच्या संख्येत झाली होती वाढ

नेवासा फाटा  (वार्ताहार) – नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज दुपारी 12 वाजता वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली. यावेळी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विठ्ठल गायकवाड यांनी आपल्या 12 सहकाऱ्यांना बरोबर घेत एक तास शर्तीचे प्रयत्न करत वाहतूक सरळीत केल्याने अखेर वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

आज नेवासा शहराचा आठवडे बाजार आसल्याने वाहतूक पोलीस नेवासा शहराकडे वाहतूक सुरळीत करण्याकडे लक्ष देत होते. त्यामुळे नेवासा फाटा येथील डॉ. आंबेडकर चौकात वाहतूक कोडी झाली होती. वाहतूक कोंडी झाल्याची खबर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विठ्ठल गायकवाड यांना समजताच त्यांनी आपल्या बारा सहकाऱ्यांसह एक तास शर्तीचे प्रयत्न करुन वाहतूक व्यवस्था सुरुळीत केली.

या वेळी पत्रकार राजेंद्र वाघमारे, हेमंत गायकवाड, अमोल क्षीरसागर यांनी वाहतूक सुरुळीत करण्याकामी पोलिसांना सहकार्य केले. नेवासा फाटा येथील वाहतूक पोलीस वाहतुकीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यातच आठवडे बाजार व लग्न तिथीमुळे वाहतुकीत वाढ झाल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस हवालदार राहुल यादव, महेश कचे, श्‍याम गुंजाळ, देसाई, गावडे यांनी वाहतूक सुरळीत केल्याने वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.