सिमला – हिमाचल प्रदेशात अश्लील मेसेजबद्दल भाजपने दोघा नेत्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यापैकी एक जण पक्षाचे नेते आणि दुसरे युवा शाखेचे पदाधिकारी आहेत. त्यांच्याबाबतच्या या मेसेजमध्ये हे दोघेजण अश्लील कृत्य करताना दिसत होते. हिमाचल प्रदेश पोलिसांनी या संदर्भात शनिवारी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली प्रकरण दाखल करून घेतले आणि हा मेसेज शेअर न करण्याविषयीचे आवाहनही नागरिकांना केले आहे.
12.30 मिनिटांचा हा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वीचा असून संबंधित नेत्यांनी स्वतःच त्याचे शुटिंग केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या युवा नेत्याच्या पत्नीचा या व्हिडीओमध्ये हात होता. तिनेच हा व्हिडीओ आपल्या पतीला फेब्रुवारी महिन्यात हा व्हिडीओ पाठवला होता.
या युवा नेत्याच्या पत्नीचा आणि एका अन्य महिलेच्या संभाषणाचा संवाद असलेला ऑडिओ मेसेजही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये युवा नेत्याची पत्नी संबंधित महिलेला आपल्या पतीपासून दूर राहण्यास सांगत असल्याचे ऐकू येत आहे.
निलंबित करण्यात आलेले भाजपचे दोन्ही नेते कुलू जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी आहेत. या दोघांनाही निलंबित करण्यात आले असल्याचे भाजपचे राज्य उपाध्यक्ष गणेश दत्त यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.