पाण्याच्या टाकीसाठी दिली दोन गुंठे जमीन

उद्योजक अण्णासाहेब काटे यांची सामाजिक बांधिलकी

वाघोली (पुणे) – लोणीकंद तालुका हवेली येथील मगरवस्ती, ढगेवस्ती, बकोरी रस्त्यावरील ग्रामस्थांच्या पाण्याच्या सोयीसाठी उद्योजक अण्णासाहेब काटे यांनी आपल्या मालकीची दोन गुंठे जागा बक्षीसपत्र करून दिली. याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रदीप कंद म्हणाले की, समाजातील अशा दानशूर व्यक्‍तींमुळे विकासकामे अधिक गतीमान होत आहेत. काटे यांनी लोणीकंद गावच्या विकासासाठी दिलेले भरीव योगदान प्रशंसनीय आहे. यावेळी सरपंच सागर गायकवाड, उपसरपंच रामदास ढगे, माजी उपसरपंच योगेश झुरुंगे, रवींद्र कंद, माजी उपसरपंच शितल कंद, भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे, ग्रामपंचायत सदस्य सोहम शिंदे, संतोष लोखंडे, रुपेश गावडे, भाजपचे हवेली तालुका उपाध्यक्ष संतोष झुरुंगे, संगिता शिंदे, सुरेखा होले, जयश्री झुरुंगे, पुजा खलसे, मंदा कंद, अश्विनी झुरुंगे, शालेय समितीचे अध्यक्ष जय कंद, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर कंद, गोपीनाथ कंद, दिनेश शिंदे, विवेक मगर, गणेश झुरुंगे, शिंदे मामा, राजेंद्र ढगे, संतोष ढगे, ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावणे, एकता पार्क, समृध्दी पार्क, ऐश्वर्या आंगण पार्क, आदित्य पार्क, काकडे प्राईड, गोकुळ पार्क, माऊली पार्क, कृष्णकुंज 1, कृष्णकुंज 2, कृष्णकुंज 3, दत्त समृद्धी नगर, रामचंद्र डेव्हलपर्स आदी परीसरामधील ग्रामस्थ उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.